E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जांभळाचा हंगाम बहरला
Samruddhi Dhayagude
12 May 2025
१२ ते १५ टनाची आवक; दरही आवाक्यात
पुणे : जांभुळ शब्द उच्चारला की, तोंडाला पाणी सुटते. जिभेवर आंबट-गोड चव रेंगाळते. लहानांपासून थोरापर्यंत सर्वांचेच आवडते फळ असलेल्या जांभळाचा हंगाम बहरला आहे. चांगल्या प्रतीचा माल बाजारात दाखल होत असल्यामुळे ग्राहक जांभुळ खरेदीला प्राधान्य देत आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्यात दरही आवाक्यात असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी रविवारी दिली.
जांभुळ हे फळ मधुमेह आजारावर उपयुक्त ठरते. त्यामुळे या फळाला बाजारात ग्राहकांकडून कायम मागणी असते. सद्य:स्थितीत मार्केटयार्डातील फळ बाजारात कोकण, गुजरात आणि कर्नाटकातून आवक होत आहे. चांगल्या प्रतीच्या मालाला ३०० ते ४५० रूपये, तर मध्यम प्रकारच्या मालाला ८० ते ३०० रूपये दर मिळत आहे. काल बाजारात सुमारे १२ ते १५ टनाची आवक झाली. या आठवड्यात जांभळाची आवक आणखी वाढणार आहे. आवक वाढल्यानंतर दरात ५ ते १० टक्क्यांनी घट होऊ शकते, असा अंदाजही सुपेकर यांनी व्यक्त केला.
बाजारात दाखल होत असलेल्या जांभळाचा दर्जा चांगला आहे. अद्याप आईस्क्रिम आणि पल्पवाल्यानी खरेदी सुरू केलेली नाही. येत्या आठवड्यात जांभळापासून अन्य पदार्थ तयार करण्यांनी खरेदी सुरू केल्यानंतर दरात घट होईल. गुजरात येथून दाखल होत असलेले जांभळांचा आकार मोठा आहे. हे जांभुळ अधिक गोड आहेत. त्यामुळे या जांभळांना बाजारात अधिक मागणी असते. कर्नाटकातील जांभुळ आकाराने मोठे असून गोड आहेत. तर कोकणातील जांभुळ आकाराने लहान असतात. तसेच ते तुरट गोड असतात. त्यामुळे गुजरातच्या तुलनेत कोकणातील जांभळाला मागणी थोडी कमी असते, असेही सुपेकर यांनी नमूद केले.
गुजरातच्या जांभळाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या आठवड्यात कर्नाटकातून जांभळाची आवक वाढणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जांभळाचे दर ५ ते १० टक्क्यांनी अधिक आहेत. मात्र त्यात लवकरच घट होणार आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा काही प्रमाणात कोकण, आणि गुजरात येथील जांभळाला फटका बसला आहे. मात्र यंदा जांभळासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे झाडांना फळधारणा चांगली आहे. त्यामुळे बाजारात लवकर आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे व्यापारी माऊली आंबेकर यांनी सांगितले.
जांभळाला ग्राहकांची पसंती
चांगल्या प्रतीच्या जांभळाची आवक सुरू झाली आहे. नुकताच हंगाम सुरू झाला आहे. येत्या आठवड्यात आवक आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही घट होईल. हंगामाच्या प्रारंभीपासून जांभळाला ग्राहकांकडून मागणी आहे. सुमारे अडीच महिने जांभळाचा हंगाम सुरू असणार आहे. परराज्यातील जांभळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज आहे.
पांडुरंग सुपेकर, व्यापारी मार्केटयार्ड.
Related
Articles
सरकारने धर्मांधपणे वागू नये
29 May 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
’कुकडी’च्या पाणी साठ्यात वाढ
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
सरकारने धर्मांधपणे वागू नये
29 May 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
’कुकडी’च्या पाणी साठ्यात वाढ
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
सरकारने धर्मांधपणे वागू नये
29 May 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
’कुकडी’च्या पाणी साठ्यात वाढ
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
सरकारने धर्मांधपणे वागू नये
29 May 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
’कुकडी’च्या पाणी साठ्यात वाढ
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार